
GDP India
रिझर्व बँकेचे अध्यक्ष श्री. दास यांनी अलीकडच्या मुलाखातीत सांगितले कि देशाच्या GDP मध्ये १.९ % वाढ संभवते. १४ ते १८ % शेतीचा वाटा (५५ % लोकसंख्या या क्षेत्रात असूनही), ३० % उद्योगाचा वाटा आणि ५२ ते ५६ % सेवाक्षेत्राचा वाटा GDP मध्ये आहे. सध्याच्या परिस्थितीत उद्योग आणि सेवाक्षेत्राचा गडप तर वाढू शकत नाहीये.
शेतीशेत्रातच आणि शेती निगडीत सेवा खेत्रातच वाढ संभवते. यंदा खरीपात पावसाचा तडाखा बसूनही आणि रब्बी मध्ये अवकाळी पाऊस आणि कोरोनाचे संकट येवूनही शेती क्षेत्राच्या उत्पादनात वाढ झालेली दिसते. या उत्पादन वाढीचे रूपांतर GDP च्या वाढीतही व्हायला हवे.
अस्मानी सुलातानीच्या संकटात शेती, शेतकरी आणि शेतीक्षेत्राशी निगडीत असलेले सेवाक्षेत्र यांची कामगिरी सहसा चांगलीच असते म्हणूनच संकटाच्या काळातही मूलभूत गोष्टींचा तुटवडा नसतो.
हे क्षेत्रे सतत अशी कामगिरी करू शकतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढवून देश जगवण्याबरोबरच देश उभारणीही करू शकतात.
ह्याला अडथळा करणारी बंधने आणि कायदे मात्र हटवावे लागतील.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा !
* कमाल जमीनधारणा कायदा
*आवश्यक वस्तू कायदा
*जमीन अधिग्रहण कायदा
रद्द करा ! रद्द करा !!
#AntifarmerLaws
#Kisanputra_Andolan