मी स्वतः १९ मार्च रोजीच्या “अन्नत्याग आंदोलन” मध्ये सहभागी होणार आहे. या निमित्ताने मी सहवेदना रँली आणि एक दिवसाचा उपवास हे उपक्रम राबणार आहे.
आपण देखील या उपक्रमात सहभागी व्हा…!
उपवास ठिकाण :
छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई.
वेळ: स. ११ ते सायं. ४
सहवेदना रँली मार्ग :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, बसस्थानक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक.
सहभाग :
आत्महत्या केलेल्या ११ शेतकऱ्यांच्या पत्नी, आधारचे अँड. संतोष पवार, माजी सरपंच वसंत मोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश काळदाते व शेकडो किसानपुत्र.
वेळ : सकाळी १० वाजता
मी माझ्या कांही सहका-यांसह १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी अन्नत्याग करतोय. त्या अगोदर ही वेदना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवासास बसण्यापुर्वी अन्नदात्यासाठी “सहवेदना रँली”काढणार आहे. या रँलीमध्ये माझ्या समवेत आत्महत्या केलेल्या ११ शेतकऱ्यांच्या पत्नी,”आधार” या सेवाभावी संस्थेचे अँड. संतोष पवार, माजी सरपंच वसंत मोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश काळदाते, यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व शेकडो किसानपुत्र सहभागी होणार आहेत.
आपण ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी या “सहवेदना रँली” आणि एकदिवस अन्नत्याग या उपक्रमात सहभागी व्हावे.
या उपक्रमात सहभागी होणा-या व्यक्तींनी आपला वाँटस्अँपचा मोबाईल क्रमांक काँमेंट मध्ये टाकावा.
किसानपुत्र आंदोलन
सुदर्शन रापतवार,
अंबाजोगाई.
७२ १८ ३० ९३ ३३