
किशोर कुकडे – Kisanputra Andolan
ऊस पिकवणारा शेतकरी ऊसतोड कामगार कधी झाला ते आमचं आम्हालाही समजलं नाही!
पाखरांसाठी हटकून आपल्या दारात धान्याची कणसं टांगून ठेवणारा शेतकरी आज आपली मुलंबाळ उघड्यावर टाकून जीव सोडण्याइतका निष्ठुर कसा झाला?
सारं जग ज्याच्यावर अवलंबून असतो तो शेतकरीच आज जगावर अवलंबून असल्यासारखा वागतोय अस का?शेतकऱ्यांना लाखोंचा पोशिंदा म्हटल्या जातं पण आज लाखोंचा पोशिंदा लांखोंच्या संख्येने आत्महत्या करतोय त्याच काय? आज कुठं कर्ज झालं म्हणून कारखानदारांनी आत्महत्या केल्याची बातमी पेपरला येत नाही,व्यापारी कर्जामुळं विष पिऊन मेला अस कुठं ऐकायला मिळत नाही,पुजाऱ्याला दक्षिणा मिळाली नाही म्हणून त्याने आत्महत्या केल्याची नोंद कुठं आढळत नाही. मग आज आत्महत्या कोण करतोय? तर तुमचा आमचा शेतकरी बाप ज्याला बळीराजा म्हटल्या जातं!
अरे बळीराजा? की बळीचा बकरा! याचा शोध घेण्याची आज गरज आहे.
आज एखाद्या आमदारांचा मोर्चा असला तर शेतकरी सगळ्यात पुढं, एखाद्या खासदाराचं आंदोलन असेल तर शेतकरी सगळ्यात पुढं, एखाद्या पुढाऱ्याचा संप असेल तर शेतकरी सगळ्यात पुढं. पण शोकांतिका अशी आहे की,शेतकरी कधी शेतकऱ्यांसाठी पुढं आलाच नाही, एकत्र झालाच नाही म्हणून ज्यांना वाकून बघितल्याशिवाय गाय का बैल हे ही समजत नाही असे राज्यकर्ते शेतकऱ्यांना शेती शिकवतायत! पण आज वेळ आहे आपल्या शेतकरी बापासाठी एकत्र या, जिथं असाल तिथं 19 मार्चला एकदिवसीय अन्नत्याग करून अन्नदात्याचा सन्मान करा.
नाहीतर एक दिवस असा येईल की येणाऱ्या पिढीला शेतकरी हा ‘गळ्यामध्ये फास’ याच स्वरूपात फक्त चित्रात पाहायला मिळेल….
मी शेतकरी म्हणून माझ्या बापाच्या सन्मानात अन्नत्याग करेल! आणी तुम्ही??????